भाजपमधील कोणता नेता आवडतो? असं रोहित पवारांना विचारले असता म्हणाले…


पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच रोहित पवार यांनी ट्विटरवरून आज जनतेबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना जनतेने अनेक प्रश्न विचारले आहेत.

 

 

यादरम्यान,  त्यांना विविध राजकीय विषयांपासून ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर विचारलेल्या प्रश्नांवर देखील रोहित पवार दिलखुलासपणे बोलत आहेत. या ट्रेंडमध्ये रोहित पवार यांना विचारण्यात आले की, भाजपमधील कोणता नेता आवडतो यावर उत्तर देत रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांचं नाव घेतलं आहे. सध्या हे चर्चेत आहे.

 

पुढे यासोबत त्यांना अनेकांनी विचारले जर तुमचा बायोपिक करायचे ठरले, तर तुमच्या व्यक्तीरेखेसाठी तुम्ही कोणाला निवडाल ? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले आहेत की, “माझा रोल मलाच करायला आवडेल.” असे पवार यांनी म्हंटल आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!