पडळकर आणि गोऱ्हे यांच्यात वाद! सभागृहात गोऱ्हे यांनी पडळकरांना दिली मोठी शिक्षा..
मुंबई : भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिक्षेचा बडगा उगारला आहे. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानं चिडलेल्या गोऱ्हेंनी पडळकरांना मार्शल बोलावून सभागृहाबाहेर काढावं लागेल अशा शब्दांत संताप व्यक्त केला. तसेच एक शिक्षाही सुनावली.
विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर गोपीचंद पडळकर भाषण करत होते. त्यावेळी सभापती नीलम गो-हे यांनी भाषण आवरते घेण्याची सूचना केली. मात्र, सभापतींच्या सूचनेवर पडळकर यांनी नाराजी व्यक्त करत काही वक्तव्य केले.
त्यावरून सभागृहातील वातावरण काहीसे तंग झाले. अखेर मंत्री दीपक केसरकर यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पडळकर यांना गुरुवारी सभागृहात बोलण्यास मनाई करण्याची कारवाई करण्यात आली.
सभापतींचा रुद्रावतार पाहत गोपिचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, तरीही त्यांची शिक्षा कायम राहणार आहे. निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त करत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी ताकीद सर्व सदस्यांना दिली.