एप्रिल महिना सुट्ट्यांनी भरलेला! ‘एवढ्या’ दिवस बँका बंद राहणार, जाणून घ्या संपूर्ण यादी..


पुणे : वर्षासाठी राज्यनिहाय बँक सुट्ट्यांची यादी जाहीर करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर आहे. बँक सुट्ट्या राज्यानुसार बदलतात म्हणून ग्राहकांसाठी ही यादी महत्त्वाची आहे. बँक सुट्ट्यांची यादी सण आणि त्या विशिष्ट राज्यासाठी त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन तयार केली जाते.

एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ असल्याने, बँका किती दिवस बंद राहणार आहेत हे आधीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, वार्षिक खात्यांच्या अंतिमीकरणासाठी १ एप्रिल ही सर्व राज्यांमध्ये अनिवार्य सुट्टी आहे. एप्रिल २०२५ मध्ये महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, बोहाग बिहू, बसव जयंती आणि अक्षय्य तृतीया निमित्त बँका बंद राहतील.

एप्रिल महिन्यातील बँक सुट्ट्यांच्या यादी..

१ एप्रिल २०२५, मंगळवार – व्यावसायिक बँकांच्या वार्षिक इन्व्हेंटरीमुळे या दिवशी बँका बंद राहतील.
६ एप्रिल २०२५, रविवार असून रामनवमी देखील आहे.

१० एप्रिल २०२५, गुरुवार – जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.
१२ एप्रिल २०२५, शनिवार -महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
१३ एप्रिल २०२५, रविवार – या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.

१४ एप्रिल २०२५, सोमवार – संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.
१५ एप्रिल २०२५, मंगळवार – बोहाग बिहूमुळे कोलकाता, आगरतळा, शिमला, गुवाहाटी आणि इटानगरमधील बँका बंद राहतील.
१६ एप्रिल २०२५, बुधवार – बोहाग बिहूमुळे गुवाहाटीमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी.
१८ एप्रिल २०२५, शुक्रवार – गुड फ्रायडे मुळे देशभरातील बँका बंद राहतील.

२१ एप्रिल २०२५, सोमवार – गरिया पूजेमुळे फक्त आगरतळामधील बँका बंद राहतील.
२६ एप्रिल २०२५, शनिवार – हा दिवस महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील.

२९ एप्रिल २०२५, मंगळवार -हा दिवस भगवान श्री परशुराम जयंती आहे. त्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
३० एप्रिल २०२५, बुधवार- बसव जयंती आणि अक्षय्य तृतीयेमुळे बेंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!