चिंता वाढली! अचानक अशक्तपणा, जुलाबाचा त्रास, GBS ने आणखी दोन जणांचा मृत्यू, परिस्थिती भयानक…

पुणे : सध्या राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या आजारामुळे चिंता वाढली आहे. सध्या जीबीएसमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या वाढली आहे. यामुळे येणाऱ्या काळात निर्बंध येण्याची शक्यता आहे.
यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यातील इतर शहरांत या आजाराचे थैमान सुरू असून, अनेक रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात जीबीएसची रुग्ण संख्या 211 वर पोहोचली आहे. यामध्ये 56 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 36 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
यामुळे हा आकडा मोठा आहे. काल ससून रुग्णालयात 37 वर्षांचा पुरुष सोनवडी (दौंड) येथील रुग्ण उपचार घेत असताना मृत्यू झाला. तो काही दिवसांपूर्वी आजारी पडला होता. त्याला अशक्तपणा आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला होता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र त्याचा मृत्यू झाला. तसेच पुण्यातील खासगी रुग्णालयात 25 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला.
तिला जुलाबाचा त्रास सुरू झाल्यावर तिच्या गिळण्यास त्रास होऊ लागला आणि अशक्तपणा वाढला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. पुण्यात ही संख्या जास्त असून येणाऱ्या काळात काळजी घ्यावी लागणार आहे.
तसेच जीबीएस सामान्यत व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दुषित किंवा कमी शिजलेले मांस, पाश्चर न केलेले दुग्दजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने या जीवाणूच लागण होते. यामुळे याबाबत सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. सध्या एकूण रुग्णांची संख्या 211 झाली आहे.
या संशयित रूग्णांपैकी 182 रूग्णांना जीबीएसची पुष्टी झालेले रुग्ण असल्याचे निदान झाले आहे,असे आरोग्य सेवांच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. याबाबत रोज एकाच मृत्यू होत आहे यामुळे काळजी वाढली असून काळजी घ्यावी लागणार आहे.