ठाकरेंना पराभवानंतर आणखीन एक धक्का; शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार कालवश; कोण आहेत नीला देसाई?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. मागील 25 वर्षापासून असलेलं,मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व संपुष्टात आलं त्यानंतर त्याच दिवशी पक्षाच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणी अशी नीला देसाई यांची मुंबई आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. नीला देसाई या शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील अत्यंत आक्रमक आणि कर्तबगार नेत्या होत्या होत्या. नीला देसाई यांच्या निधनाने कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना छातीत दुखू लागल्यानंतर देसाई यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,परंतु रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१९९० च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून नीला देसाई निवडून आल्या होत्या. शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत जाणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. त्या काळात मुंबईत शिवसेनेची मुळे घट्ट करण्यात आणि महिला आघाडीला ताकद देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.