धनंजय मुंडे यांच्याबाबत अजून एक घोटाळा समोर! कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी महत्वाची माहिती आली समोर, नेमकं घडलं काय?


बीड : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे राज्यात ५ हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता.

त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते. त्यावेळी कृषी साहित्य खरेदी करण्यात आले होते. कृषी साहित्य खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला. बाजारभावापेक्षाही अधिक दराने साहित्य खरेदी करण्यात आले.

त्याशिवाय, साहित्य खरेदीच्या निविदा खुल्या करण्याआधीच रक्कमेचे वाटप संबंधित कंपनीला करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. तर, दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. सगळी खरेदी प्रक्रिया ही नियमानुसार झाल्याचा दावा मुंडे केला होता.

धनंजय मुंडेंवर आरोप झालेल्या वादग्रस्त कृषी साहित्य खरेदी प्रक्रियेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हे कृषी साहित्य खरेदी करण्याआधी तत्कालीन खात्याच्या सचिवांची बदली करण्यात आली होती. आयएएस अधिकारी व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

कृषी खरेदीच्या वाढीव किमतींबद्दल कृषी आयुक्त व्ही राधा यांच्याकडून खरेदीला विरोध करण्यात आला होता. कामात अडसर ठरणाऱ्या कृषी आयुक्तांची आधी बदली करण्यात आली. त्यानंतरच ही वादग्रस्त खरेदी प्रक्रिया पार पडली.

दरम्यान, आयएएस अधिकारी व्ही. राधा ह्या कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्ही. राधा यांनी काम केले होते. स्वच्छ प्रतिमेच्या अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. व्ही. राधा यांच्या बदलीसाठी धनंजय मुंडे यांच्याकडून वारंवार दबाव टाकण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!