उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ


मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. नुकतेच सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या विश्वासू नेत्या वैशाली दरेकर राणे यांनी जिल्हा महिला संघटक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच हा राजीनामा समोर आला आहे. त्यामुळे कल्याणमधील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

वैशाली दरेकर राणे यांनी यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मैदानात होते. त्या निवडणुकीत दरेकर यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना वैशाली दरेकर यांनी हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे सांगितले. “वैयक्तिक कारणांमुळे मला पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे मी जिल्हा महिला संघटक पदाचा राजीनामा देत आहे. मात्र, मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सक्रिय सदस्या म्हणून पुढेही काम करत राहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. भविष्यात त्या कोणती राजकीय भूमिका घेणार, पक्षातच राहणार की वेगळा निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!