लाडक्या बहिणींसाठी सरकारचा अजून एक निर्णय ; व्यवसायासाठी आता मोठ भांडवल मिळणार…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु करण्यात आली. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. याचबरोबर आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने मोठा निर्णय घेत या योजनेतुन महिलांना व्यवसायासाठी आता 1 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. महिलांना 0 टक्के व्याजदराने हा कर्ज पुरवठा होणार आहे. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरासाठी हा कर्ज पुरवठा करण्यात येत आहे.

मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे. या योजनेत 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेमार्फत हे स्तुत्य पाऊल टाकण्यात आले आहे. बँकेने व्यावसायिक कर्ज योजनेतून 57 महिलांना कर्ज पुरवठा केला आहे. त्या धनादेशांचे वाटप मंत्री आदिती तटकरे यांनी केले. हा कर्ज धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला, त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ असल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली आहे..

