इथे बाप बसलाय!! वाल्मिक कराडचा अजून एक कारणामा समोर, थेट पोलीस PSI ला लावलेल्या फोनची क्लिप व्हायरल, उडाली मोठी खळबळ…

बीड : येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता त्याची एक फोनची क्लिप व्हायरल झाली आहे.

यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलं आह. या ऑडिओ क्लिमध्ये वाल्मिक कराड हा सायबर सेलच्या महिला पीएसआय निशिगंधा खुळे यांना फोन केला होता. या फोनवर त्याने आपल्या समर्थकाला सोडण्याची मागणी केली आहे. यामुळे त्याचा पोलिसांवर किती दबाव आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
कराडने यावेळी आपल्या समर्थकालाही कॉन्फरन्सवर घेतलं होतं. सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल होत असलेली पाहायला मिळात आहे. कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र अजूनही याबाबत ठोस कारवाई होत नसल्याचे दिसुन आलं आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फोनच्या या संभाषणात वाल्मिक कराड बोलतोय, नंतर पीएसआय निशिगंधा खुळे त्याला अण्णा म्हणत आहेत. कराड हा कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी सांगत आहे. यावर निशिगंधा खुळे, पोस्ट डिलीट केली म्हणजे बास झालं अण्णा वातावरण खराब होतं, अस म्हणत आहेत.
तसेच सर्वांना फोन सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर कराड आपल्या समर्थकाला इग्नोर करायचं मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेलो आहोत आपण. त्यानंर कराडचा समर्थक, तुम्ही आहेत म्हणूनच दम घरला आम्ही, धमक्या द्यायला लागले म्हणून तुम्हाला फोन केला, असं सांगत आहे.
नंतर कराड हा त्यावर तुमच्यासमोर कॉल स्पिकरला ठेवून बोललो आपण, द्या विषय सोडून असं सांगत आहे. यामुळे त्यांच्या पोलीस दलातील ओळखीचा अंदाज येतो. यावर अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. त्या महिला निरीक्षक ज्या आहेत त्या त्यांच्याशी छान हसत खेळत बोलतायेत.
फोन ठेवल्यावर बघितलं ना, ऐकलं ना, कसं केलंय मी बा बसलोय आपण इकडे. हे सर्व ऐकल्यावर एकच प्रश्न पडतो की, कधी हे अधिकारी अधिकाऱ्यांसारखे वागणार? सगळ्या राजकारण्यांचे ऑर्डर घेण्यापासून थांबणार, असेही त्यांनी म्हटले आहे. आता यावरून वातावरण तापलं आहे.