सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा दणका? एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीबाबत आज होऊ शकते मोठी घोषणा; दिल्लीत महत्त्वाची बैठक…


नवी दिल्ली : इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून त्याचा फटका भारतालाही बसू लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. काही भागांमध्ये इंधनटंचाईची स्थिती निर्माण झाली असून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

राज्यात सध्या अवघ्या एका महिन्यापुरताच पेट्रोल-डिझेलचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, 15 मे रोजी इंधनाच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर 19 मे रोजी पुन्हा 90 पैशांनी दरवाढ करण्यात आली. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे.

याचबरोबर एलपीजी गॅसच्या दरवाढीचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे एलपीजीचा पुरवठाही प्रभावित झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडर आधीच महाग झाले आहेत. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही कधीही वाढ होऊ शकते, अशी चर्चा आहे.

मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सरकारने कोणतीही वाढ केलेली नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत असून, या बैठकीत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल 109 डॉलरच्या पुढे गेल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत इंधन दरात जवळपास 3.90 रुपयांची वाढ झाली असून आता घरगुती एलपीजीच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढती महागाई आणि इंधन दरांचा मुद्दा चर्चिला जाण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!