हगवणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का!! महत्त्वाची माहिती समोर, पोलिसांनी सगळंच बाहेर काढलं..

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात अडकलेल्या हगवणे कुटुंबावर आता आर्थिक फसवणुकीचाही गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामुळे त्यांची जेसीबी मशीन जप्त करण्याची कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी केली आहे, याबाबत कसून चौकशी सुरु आहे.

यामुळे हगवणे कुटुंबाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणातील गुंतागुंत वाढत असून, आता त्यांच्यावर केवळ छळाचेच नव्हे, तर आर्थिक फसवणुकीचेही आरोप आहेत. यामध्ये प्रशांत अविनाश येळवंडे (वय ३३, रा. निधोजे, ता. खेड, जि. पुणे) यांनी २९ मे रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
यामध्ये पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपामुळे हगवणे कुटुंबाची आर्थिक व्यवहार आणि त्यांची नैतिकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या कुटूंबाचे कारनामे दररोज समोर येत आहेत. याबाबत सध्या पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, त्यात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या आर्थिक व्यवहारांची आणि संबंधित कागदपत्रांची कसून तपासणी केली जाईल, ज्यामुळे या फसवणुकीमागील सत्य समोर येऊ शकेल. यामुळे तपास सुरु असताना आता अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हगवणे कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशीही होण्याची शक्यता आहे. त्यांची जेसीबी मशीन जप्त करण्यात आल्याने, या प्रकरणाचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत त्यांच्या अडचणी अजूनच वाढण्याची शक्यता आहे.