माळेगावमध्ये आण्णा की दादा? आज मतदान, निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष, अजितदादांची प्रतिष्ठा पणाला…


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार स्वतः उमेदवार असून तेच चेअरमन पदाचे उमेदवार देखील असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच विरोधक असलेले रंजन काका तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी देखील पॅनल उभे करत तगडे आव्हान दिले आहे. यामुळे आज मतदान कशाप्रकारे आणि किती टक्के होणार हे समजेल. कारखाना निवडणुकीमध्ये चार पॅनल तयार झाल्याने यासाठी सर्वांनी आपली ताकद पानाला लावली आहे. अजित पवार आणि चंद्राव तावरे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्याने निवडणूक चांगलीच गाजली.

या निवडणुकीमध्ये शरद पवार गट तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे चंद्रराव तावरे रंजन काका तावरे आणि शेतकरी पॅनल असे चार पॅनल आहेत. यामुळे मतांची टक्केवारी देखील वाढेल असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याचा आरोप होत आहे.

तसेच मतदान मतमोजणीची प्रक्रिया याचे ठिकाण देखील बदलण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणल्याचे बोलले गेले. यामुळे निवडणूक चांगलीच गाजली आहे. आता या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे देखील गणित जुळवायचे आहे.

यामुळे अजित पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून मागील दहा-बारा दिवस ते बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. खासदार सुप्रिया सुळे तसेच युगेंद्र पवार यांनी देखील प्रचारसभा घेतल्याने आता रंगत वाढली असून सध्या सभासद देखील बाहेर पडत मतदान करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!