Anganwadi Sevika : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर


Anganwadi Sevika  : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांचे अर्ज भरताना एका अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मोहोळ तालुक्यातील वाळूज देगाव येथे हा प्रकार घडला आहे.

सुरेखा रमेश आतकरे (वय. ४८, रा. वाळूज देगाव) असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ मिळण्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ नावाच्या ॲपवरून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना सतत तांत्रिक अडचणी उद्भवतात. अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे ऑनलाईन अर्ज भरत होत्या. Anganwadi Sevika

वसुधा जयराम लाकुळे नावाच्या लाभार्थी महिलेचा ऑनलाईन अर्ज भरत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने सुरेखा आतकरे खुर्चीतच कोसळल्या आणि निपचित पडल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे आतकरे यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!