दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा मुलाने केला खून, हडपसर येथील घटना…!

पुणे : हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरी दारु पिऊन शिवीगाळ करीत असलेल्या वडीलांशी झालेल्या वादातून मुलाने वडिलांना काठीने मारहाण करुन त्यांचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रवि क्षीरसागर असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी ओंकार रवी क्षीरसागर याला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, त्यांची पत्नी रेखा रवी क्षीरसागर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मांजरीतील घुले पाटील कॉलनीत घडली आहे.

रवी हा नेहमी दारु पिऊन येऊन शिवीगाळ करीत असे. ९ मे रोजी तो असाच दारु पिऊन घरी आला व शिवीगाळ करु लागला.
त्याचा राग येऊन ओंकार याने वडिलांना काठीने मारहाण केली. त्यांचा गळा दाबला. त्यात रवी हा निपचित पडला.

शवविच्छेदनात त्यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फिर्यादी यांनी चौकशी केल्यावर मुलानेच त्यांचा गळा दाबून मारल्याचे उघड झाले. याबाबत तपास सुरू आहे.