अमूलकडून दुधाच्या दरात कपात, आता एक लिटरचा भाव किती असणार? जाणून घ्या…


मुंबई : सध्या देशात दिवसेंदिवस सर्वच गोष्टींच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत दुधाची किंमत १ रुपयाने कमी झाली आहे. यामुळे ही एक दिलासादायक बातमी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदी दरात काय घट होणार का? याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमूल दुधाच्या किमती कमी केल्याने कंपनीला बाजारात स्पर्धा टिकवून ठेवण्यास मदत होईल. वेदांत, दूध रत्न आणि सुरभी यांसारख्या इतर डेअरी ब्रँडनाही या बदलाचा प्रभाव जाणवू शकतो. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि दुधाची उपलब्धता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

उत्पादन खर्चात कपात आणि उत्तम व्यवस्थापनामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार दूध मिळावे हा आमचा नेहमीच उद्देश राहिला आहे. असेही अमूलकडून सांगण्यात आले आहे. आता ग्राहक आता चांगल्या किमतीत दर्जेदार उत्पादने शोधतील.

याचा परिणाम म्हणजे इतर ब्रँड्स देखील दुध कपात करण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात याबाबत दर कमी जास्त होण्याची शक्यता आहे. आता अमूल गोल्डचा एक लिटर पॅक ६६ रुपयांना, तर अर्धा लिटरचा पॅक ३३ रुपयांना मिळणार आहे. नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

तसेच अमूल फ्रेश मिल्कची किंमत आता ५४ रुपये प्रति लिटर आहे, तर अर्धा लिटर पॅक २७ रुपयांना उपलब्ध असेल. अमूल शक्तीचा एक लिटर पॅक आता ६० रुपयांना मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

उत्पादन खर्चात झालेली घट आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरकपात फक्त गुजरातमधील ग्राहकांनाच मिळणार आहे. महाराष्ट्रात दूर कपात होणार का? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!