अमोल मिटकरी तुम्हाला हे महागात पडेल!!! खासदार बनरंग सोनवणे संतापले, थेट इशाराच दिला, नेमकं काय घडलं?

बीड : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट करत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर टीका केली होती. यामध्ये अमोल मिटकरी यांनी एक फोटो शेअर शेअर सोनवणे यांचावर टीका केली होती. या फोटो मध्ये वाल्मिक कराड आणि बनरंग सोनवणे आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली होती.
तसेच या फोटो सोबत अमोल मिटकरी यांनी लई अवघड हाय गड्या उमगाया बाप्पा रं! असं कॅप्शन दिलं आहे. आता अमोल मिटकरी यांच्या या फोटोनंतर बजरंग सोनावणे संतापले आहेत. त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच इशारा दिला आहे.
ते म्हणाले, वअमोल मिटकरी यांना फोटो शेअर करणे हे खूप महाग पडेल, तुमचे फोटोही बाहेर येतील.’ असा इशाराही बजरंग सोनावणे यांनी दिला तर पुढे ते असेही म्हणाले, कोण कुठे जातंय? या प्रकऱणातील आरोपी कुठे, कोणाच्या घरी राहिलेत? त्यांच्याबरोबरीचे फोटो ट्वीट करा, असेही सोनवणे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटेनचा सर्व स्तरावरुन निषेध केला जात आहे.
तसेच ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातल्या दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. अशातच आता वाल्मिक कराड आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. विष्णू चाटेच्या चौकशीत विष्णू चाटेने एक महत्त्वाची कबूली दिली आहे आणि त्यामुळेच वाल्मीक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी होऊ शकतो असे समोर आले आहे.
वाल्मीक कराड याने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणं संभाषण केले होते अशी माहिती विष्णू चाटे याने दिली आहे. सीआयडीने न्यायालयात दिलेल्या अहवालात ही कबुली नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे विष्णू चाटे याच्या फोनवरून वाल्मीक कराड याने धमकी दिल्याची जी तक्रार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली होती, ती चाटे याने कबूल केली आहे. त्यामुळे आता वाल्मीक कराड अडचणीत येऊ शकतो.