Amol kolhe : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश? अमोल कोल्हे यांनी दिल्या अशा शुभेच्छा…

Amol kolhe : राज्याच्या राजकारणात दररोज अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला शिरुर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शिरुरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमधून घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Amol kolhe

तसेच आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याचेही बोलले जात आहे. यावरुन शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.


अमोल कोल्हे यांची टीका…
शिरुरमध्ये बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी लढत आहे. आढळराव पाटील यांना चौथ्या पक्ष प्रवेशाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजकीय ताकदवान नेत्यांना उमेदवार आयत करावं लागणं हेच माझे यश आहे.
केवळ पदासाठी सुरू असलेले तडजोडीचे राजकारण जनता बघत आहे, असे म्हणत समोर काय आहे? कोण आहे? याचे आव्हान करत नाही,” असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.