Amol Kolhe : अजित पवार यांच्या पराभवाचा निर्धाराला अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले कोल्हे….

Amol Kolhe पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेवर हल्ला चढवल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी सौम्य भूमिका घेत दादा मोठे नेते, त्यांना प्रत्युत्तर देणे उचित ठरणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, दादा मोठे नेते आहेत, इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे. मी त्यांच्याविषयी काहीच बोलणे उचित ठरणार नाही. ना मी राजकारणातील, ना मला कोणती राजकीय पार्श्वभूमी, ना माझा कारखाना, ना माझी शिक्षण संस्था आहे. Amol Kolhe
काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये येणे, हे मला पटत नाही. मला दिलेली जबाबदारी महत्त्वाची वाटते आणि शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली, हीसुद्धा अशीच पार पाडीन. यापुढेही शिरुर मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न आहे, ते मार्गी लावण्याचं काम करत राहीन.
मला वाटत नाही की, दादांइतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने बोलावे हे मला बरोबर वाटत नाही. अशी मवाळ भूमिका खासदार अमोल कोल्हे यांनी स्वीकारल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.