Amit Shah : भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार? अमित शाह यांच्या वक्तव्यानं चित्र स्पष्ट…

Amit Shah : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्वोतोपरी तयारी केली आहे. स्पर्धेचं प्रारूप वेळापत्रकापासून नियोजनापर्यंत खलबतं सुरु आहेत. फक्त भारतीय संघ पाकिस्तानात येणार की नाही यावर घोडं अडून बसलं आहे.
बीसीसीआयने भारतीय पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. भारत सरकाराने परवानगी दिली तरच टीम इंडिया पाकिस्तानात येईल असं बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
असं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले विधान महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या विधानाचा सरळ अर्थ भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असाच निघत आहे. Amit Shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, जोपर्यंत तिथला दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तान सरकारशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. त्याआधी आम्हाला जम्मू काश्मीरमधील तरूणांचे मत जाणून घ्यायचे आहे आणि त्यांच्याशी बोलायचे आहे. अमित शाह यांचे हे विधान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही लागू होत आहे. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट होत आहे.