उरुळीकांचन परिसरात कथित लॉज व्यावसायिकांनी फोफावली देहविक्रीची संस्कृती! गावची नावे नाहक बदणाम; पोलिस उत्पन्नाच्या कमाईत….

जयदिप जाधव

उरुळीकांचन : उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कथाकथित लॉज व्यावसायिकांकडून सुरू असलेल्या महिला देहविक्रीच्या व्यवसायामुळे स्थानिक ग्रामस्थांत संतापाची भावना आहे. कथित लॉज व्यावसायिकांकडून खुलेआम हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू असताना पोलिसांच्या आर्शिवादाने हप्तेखोर वृत्तीला उत्तेजन मिळत असल्याने उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या ‘अर्थिक’ धोरणाची चर्चा सुरू झाली असून देहविक्रीत भरघोस उत्पन्न मिळत असल्याने व्यावसायाला चलती असल्याची चर्चा परिसरात आहे.
पुणे ग्रामीण पोलिस दलातील उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या देहविक्रीच्या चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. कथित लॉज व्यावसायिकांनी उघड्यावर हा गोरख धंदा सुरू केल्याने हॉटेल व्यावसायिकांना मिळत असलेल्या भर- घोस उत्पन्नात पोलिसांनी आपले उत्पन्न वाढविले असून मिळत असलेल्या या उत्पन्नातून पोलिस ठाण्याचे उत्पन्न वाढल्याने या व्यवसायाला अर्थिक पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे.

उरुळीकांचन पोलीस ठाण्यातील पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळीकांचन, सोरतापवाडी या गावांत असा उघडपणे व्यवसाय सुरू झाल्याने ना भिती ना संकोच म्हणून या ठिकाणी जिल्ह्यातून येणाऱ्या ग्राहकांचा फेरा वाढला आहे. ग्राहक या ठिकाणी बिनधास्तपणे आपली रासलीला घडवत असून या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांना मिळत असलेल्या उत्पन्नातून देहविक्रीचे धंदे खुलेआम सुरू असल्याची चर्चा आहे.

उरुळीकांचन व सोरतापवाडी परिसरात जिल्ह्यातील वाटसरु तसेच परप्रांतीय नर्सरी खरेदीदारांकडून या ठिकाणी या व्यावसायाला आधार मिळत असल्याने हा व्यवसाय अतिशय जोमाने सुरू असून ग्रामस्थांच्या डोळ्यासमोर हा व्यवसाय सुरू असल्याने या ठिकाणचे नैतिक अधिष्ठान संपुष्टात येत असल्याने ग्रामस्थ अशा प्रकाराने संतप्त झाले आहेत
ग्रामस्थांकडून तीव्र शब्दांत संताप!
उरुळीकांचन व सोरतापवाडी या ठिकाणी अशा प्रकारे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने या प्रकारांनी स्थानिक गावची बदणामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच या ठिकाणी ग्रामस्थांची कुचंबणा होऊन स्थानिक संस्कृती बिघडू लागल्याने ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करीत असून हे प्रकार थांबले नाही तर आंदोलन करण्याचा भूमिकेत ग्रामस्थ आहेत.
राजकीय पाठबळ?
उरुळीकांचन पोलिस ठाण्यातील मटका ,जुगार व अवैद्य दारुधंद्याला परवानगी व व्यवस्था करुन देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मंडळी अग्रेसर असल्याची चर्चा आहे. व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी पडद्याआड ही मंडळी कार्यरत असून या अवैद्य व्यावसायिकांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे.