‘आली लहर केली कहर’ दसऱ्याचे सिमोल्लंघनम्हणून परवाना धारक पिस्तुलातून हवेत गोळीबार! कोरेगामूळ येथील प्रकरणात दोघांना अटक….


उरुळी कांचन : दसऱ्याची परंपरा आहे म्हणून थेट पिस्तुलातून हवेत बार काढून सिमोल्लंघन करण्याची परंपरा असल्याचा भास निर्माण करुन हवेत गोळीबार करण्याचा प्रकार कोरेगाव मुळ(ता.हवेली) येथे घडला आहे. एकाच्या परवानाधारक पिस्तुलातून दुसऱ्यानेच पिस्तुल हाताळून हवेत गोळीबार काढल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी पिस्तुल परवानाधारक व दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

अजिंक्य बाजीराव कड (वय -१८ रा.कोरेगावमूळ ) असे पिस्तुलातून हवेत गोळीबार करणाऱ्याचे नाव असून पिस्तुल परवानाधारक जयसिंग वामन तांबे -भोसले (वय- ७१ रा. कोरेगावमूळ ) असे दोघा आरोपींचे नाव आहेत. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून तात्काळ अटकेची कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य कड हा दसऱ्याच्या सणाला पिस्तुल परवानाधारक जयसिंग वामन तांबे यांचा परवाना धारक पिस्तुल घेऊन शस्त्रपूजनासाठी आला होता त्याने सिमोल्लंघनाची परंपरा असल्याचे सांगून घटनास्थळी थेट पिस्तुलातून हवेत गोळीबार काढला व शस्त्राची पूजा केली आहे. दरम्यान या प्रकाराने थेट लोकवस्तीत शस्त्राच्या सहाय्याने थेट गोळीबार काढल्याने नागरिकांच्या जिवितास धोका उद्भवेल व नागरीकांवर दहशत निर्माण होईल अशी कृती करण्यात आली आहे.

दरम्यान दसऱ्याच्या सणाला सिमोल्लंघनाला हवेत गोळीबार केल्याची परंपरा असल्याचा दावा करुन सदर आरोपीने थेट कायदा हातात घेण्याचा प्रकाराने केल्याने या प्रकाराने हवेत गोळीबार करण्याचा प्रकार सामाजात दहशत माजविण्याचा उद्देशा ने केला की या हवेत गोळीबार करण्याचा प्रकार गुन्हेगारी चे उदात्तीकरण करण्याचा हेतूने झाला म्हणून अनेक सवाल उपस्थित करण्यात येत असून समाजावर बंदुकीचा धाक दाखविणाऱ्यावर साधक बाधक कारवाई होणार की गुन्हेगारावर कायद्याचा बडगा उगारुन मोठी कारवाई होणार म्हणून सर्वांचे लक्ष पोलिसांच्या कारवाईवर लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!