मद्यप्रेमींची चिंता वाढली! मद्यावरील शुल्क वाढले, कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय, नव्या दरानुसार कोणती दारू किती रुपयांना?


मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावेळी राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर ( IMFL) दिड टक्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यास गटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी इतर राज्यातील राबविण्यात येत असलेल्या चांगल्या पध्दतींचा, धोरणात्मक बाबींचा अभ्यास करुन शासनास शिफारशी व अहवाल सादर केला.

दरम्यान, त्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित आकृतीबंधास तसेच विभागाचे एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यास मान्यता देण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून एआय प्रणालीद्वारे राज्यातील आसवन्या, मद्य निर्माणी, घाऊक विक्रेते आदींचे नियंत्रण करण्यात येणार आहे.

१८० मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत..

देशी मद्य- ८० रुपये
महाराष्ट्र मेड लिकर – १४८ रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – २०५ रुपये
विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- ३६० रुपये

दरम्यान, यासोबतच राज्य सरकारने आता सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता दिली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता यातून आणखी महसूल वाढणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!