Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CID करण्याची शक्यता, महत्वाची माहिती आली समोर…

Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.
या प्रकरणानंतर आता विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यानंतर आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार आहे. अक्षय शिंदे याने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले. यानंतर पोलीस पथकाच्या दिशेने ०३ राऊंड फायर केले.


त्यापैकी १ राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने २ राऊंड इतरत्र फायर केले. यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने ०१ गोळी फायर केली. ही गोळी आरोपी अक्षय शिंदेंला लागली आणि तो जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. Akshay Shinde Encounter
दरम्यान, या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे. आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्याने याप्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली जात होती. अखेर आता याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.