अजितदादांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले स्वयंघोषित आमदार, गाडीवर आमदार नसतानाही लावला ‘आमदार लोगो’, कारवाई होणार?


सोलापूर : महाराष्ट्रात 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधान परिषद सदस्यांनाच त्यांच्या अधिकृत वाहनावर ‘आमदाराचा लोगो’ वापरण्याची परवानगी आहे. हा लोगो शासकीय कामासाठी अधिकृत ओळख म्हणून वापरला जातो. असे असताना आमदार नसताना अनेकांच्या गाडीवर हा लोगो अनेकदा दिसून आला आहे.

असे असताना आता सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर ‘आमदाराचा लोगो’ लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने मोठी चर्चा रंगली आहे. उमेश पाटील हे विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य आमदार नाहीत, मात्र तरी देखील हा लोगो लावल्याने ते अडचणीत आले आहेत.

उमेश पाटील यांच्या एमएच 04 एचडी 5565 क्रमांकाच्या वाहनावर आमदाराचा लोगो लावलेला दिसून आला. हा प्रकार सोलापुरातील विश्रामगृह येथे उघडकीस आला आहे. यामुळे आता ‘आमदाराचा लोगो’ लावण्याचा अधिकार नेमका कोणाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्ष पाटील यांना हा अधिकार नसतानाही त्यांनी तो वापरल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत अजित पवार कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून, ‘उमेश पाटील यांना हा अधिकार कोणी दिला?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून काही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जातात. अनेकदा ते आपल्याच लोकांवर कारवाई करताना मागेपुढे बघत नाहीत. यामुळे आता या प्रकरणात अजित पवार उमेश पाटलांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत हा विडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!