अजित नागरी पतसंस्थेकडून सभासदांची फसवणूक! माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यावर फसवणूक प्रकरणी कारवाई करावी; वसंत मोरे आक्रमक…

पुणे : अजित नागरी पतसंस्था प्रकरणी राज्य सहकार आयुक्तांचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच या पतसंस्था मार्फत करण्यात आलेल्या फसवणुकीचा कारभार ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी समोर आणला आहे. वसंत मोरे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, अजित नागरी पतसंस्था यांच्या विरोधात आम्ही एक जनता दरबार घेतला होता. आणि त्या जनता दरबारमध्ये आमच्याकडे दोनशे ते अडीचशे लोकांचे तक्रार प्राप्त झाल्या आहेत.
त्याच्यानंतर आम्ही एक व्हाट्सअप ग्रुप स्थापन केला. त्या ग्रुपमध्ये जवळ जवळ आतापर्यंत ४०० लोकांच्या सेम तक्रारी प्राप्त झाले आहेत. बचत गट स्थापन करून त्याच्यामध्ये कर्ज देण्यात आले. २० हजार ते ४० हजार रुपये पर्यंत लोकांना कर्ज दिली.
परंतु लोकांकडून लाखांपेक्षा जास्त पैसे जमा केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच अजून सुद्धा लोकांकडून दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी काढण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे अतिशय गोरगरीब लोकांना लुटण्याचा हा प्रकार आहे. आता जसं जसं आम्ही.. या प्रकरणांमध्ये खोलात चाललोय.. तसं तसं एक एक वेगळे कंगोरे अजित नागरी पतसंस्थेच्या बाबतीत समोर येत आहे.
ते पुढे म्हणाले की, आज या संदर्भातील एक वेगळा विषय आम्ही इथेच घेऊन आलो होतो. बारा ते तेरा लोकांची तक्रार वेगळ्या पद्धतीने आता समोर आली आहे.यामध्ये सगळ्या महिलांचा समावेश आहे. या महिलांना जो काही कर्ज देण्यात आला. बचत गटाच्या माध्यमातून दिला. या कर्जामध्ये इतकी अनियमतता असून कोणाला कोण ओळखत नाही आहे. वास्तविक पाहता बचत गटाला एखादा कर्ज दिला जातो. त्यावेळेस एकमेकांना ओळखणारी लोक असतात. परंतु तसं न करता फक्त आणि फक्त त्यांच्याकडची कर्ज द्यायची म्हणून हा कर्ज देण्यात आला आहे.
आमच्या माहितीनुसार दोन वर्षात हा कर्जाचा प्रकार मोठ्या प्रमाणात झाले आहे. २०१८ सगळ्यांना कर्ज देण्यात आले आहे म्हणजेच कोरोनाच्या अगोदर आणि त्यांच्यानंतर एके दिवशी त्यांनी आपल्या संपूर्ण पतसंस्था बदलल्या.. आणि त्यानंतर सगळ्यांना नोटीसा काढल्यात.
काही अशा महिलांचा देखील यात समावेश आहे. ज्यांना कर्जदेखील देण्यात आलेला नसून त्या महिलांनी एक रुपया सुद्धा पतसंस्था कडून घेतलेला नसून या महिला पतसंस्थेला ओळखत देखील नाही. तसेच पतसंस्थेच्या माणसे देखील महिलांना ओळखत नाही. तरीदेखील अशा महिलांना कर्ज दिल्याची खोटी माहिती आहे.
एका महिलेच्या नावाने दुसऱ्या महिलांना कर्ज देण्यात आले आहे. २०१८ एका महिलेच्या नावाने तीस हजार कर्ज देऊन त्यांच्या नावाचे बोगस कागदपत्रे वापरून बँकेत पैसे काढल्याचा धक्कादाय प्रकार देखील समोर आला आहे. याबाबत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. याठिकाणी मयत व्यक्तीच्या नावाने देखील कर्ज काढून फसवणूक केली गेली आहे. याबाबत अजित पवारांकडे देखील तक्रार केली आहे.
तसेच बँकेत या महिलेची डुबलीकेट सही देखील करण्यात आली आहे. ही लोक अजित पतसंस्थेचे असून त्यांच्याकडून हा प्रकार संघट मताने करण्यात आला आहे. पतसंस्थेच्या २०१८ ला जो मॅनेजर असतील त्यांनी आणि पतसंस्था चे संचालक माजी आमदार अशोक टेकवडे त्यांचा मुलगा अजिंक्य एक टेकवडे यांचा यात समावेश आहे. असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. मॅनेजर आणि पतसंस्था चे संचालक माजी आमदार अशोक टेकवडे त्यांचा मुलगा अजिंक्य एक टेकवडे यांच्यावर फसवणूक प्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत वसंत मोरे म्हणाले, ही बाब आपण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार संजय राऊत, आंबदास दानवे यांच्या कानावर घातली आहे. लवकरच याबाबत पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.