अजित पवारांचा मोठा निर्णय!! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत बोलावलं, धनंजय मुंडेबाबत घेतला महत्वाचा निर्णय…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये घेतलेल्या डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या परळीत कामे न करताच बोगस बिलांद्वारे रक्कम घेऊन कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
यामुळे या व इतर प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला आहे. याबाबत अजित पवार यांनी यासंबंधी माहिती घेण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकार्यांना तातडीने मुंबईला बोलावले होते. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. यामुळे आता याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संशयाची सुई आहे.
यामध्ये 73 कोटींच्या या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार यांनी मागील दोन वर्षांतील निधीच्या वितरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. आता अजित पवार अॅक्शन मोडमध्ये असून त्यांनी बीडच्या जिल्हाधिकार्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मागील दोन वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी करण्यात येत आहे. अजित पवारांनी निर्देश दिल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. चिंचाने हे कागदपत्रांसह मुंबईच्या कार्यालयात आले आहेत. यामुळे याठिकाणी आता सगळी चौकशी होणार आहे.
यामध्ये चौकशीत शाळा आणि अंगणवाड्यांना साहित्य पुरवण्याच्या कामात मोठी अनियमितता दिसून आली आहे. याबाबत भाजप आमदार सुरेश धस आक्रमक झाले असून त्यांनी याबाबत आवाज उठवला आहे. यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.