बारामतीत इच्छुकांच्या गर्दीवर अजित पवारांचा जालीम उपाय, गटबाजी टाळण्यासाठी धक्कातंत्र, जय पवार असणार उमेदवार?


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार राजकारणात सक्रिय प्रवेश करणार असल्याची चिन्हे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासूनच जय पवार यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा होती.

जय हे बारामतीच्या स्थानिक राजकारणात सक्रिय असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या प्रचारातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. यंदा बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, राष्ट्रवादी पक्षातच अनेकजण इच्छुक आहेत.

       

यामुळे पक्षात गटबाजी आणि संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. हा अंतर्गत वाद टाळण्यासाठीच अजित पवार थेट जय यांना उमेदवारी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

जय पवार हे अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांचा कल राजकारणापेक्षा उद्योग-व्यवसायाकडे जास्त राहिला आहे. त्यांनी काही काळ दुबईत व्यवसाय केल्यानंतर आता ते मुंबई आणि बारामती येथील आपले व्यवसाय सांभाळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!