अजित पवारांचे जवळचे मंत्री दत्तामामा भरणे नाराज?? थेट परदेशात निघून गेले, नेमकं कारण काय?


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्ती केली होती.

शिवाय, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरु असल्याचेही समोर आले होते. दरम्यान, आता अजित पवारांच्या मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील नाराज असल्याचे समोर आले आहेत. दत्तात्रय भरणे हे कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे क्रीडा खाते देण्यात आले होते.

तसेच दत्तात्रय भरणे नाराज असल्याने मंत्रीपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला नाही. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान, त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय भरणे हे सहकुटुंब परदेशात गेले आहेत.

क्रीडा खाते मिळाल्याने ते नाराज आहेत . गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीसाठी सहकुटुंब परदेशात गेले आहेत. ते थेट मंगळवारी भारतात येतील अशी माहितीही त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाने दिली आहे.

क्रीडा खातं मिळाल्याने दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अजूनही आपल्या मंत्रि‍पदाचा कारभार स्वीकारलेला नाही. नाराज असल्याने ते सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती आहे. दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून निवडून आले आहेत. मागील सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू म्हणून दत्तात्रय भरणेंची ओळख आहे. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये त्यांना क्रीडा खातं देण्यात आलंय. ते त्यांच्या नाराजीचं कारण ठरलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक दिवस उलटून देखील त्यांनी कारभार स्वीकारलेला नाही. दरम्यान, आता ते सुट्टीच्या नावाखाली सहकुटुंब परदेशात गेले आहेत. त्यांच्या नाराजीची चर्चा मतदारसंघात देखील आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!