अजित पवार देणार अशोक पवार यांना धक्का!! घोडगंगा कारखान्याबाबत घेणार मोठा निर्णय…

शिरूर : गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार अशोक पवार यांच्याकडे असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे. असे असताना आता हवेली तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यासाठी अजित पवारांनी बैठका घेतल्याची माहिती आहे.
यामध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा आणि थेऊर येथील साखर कारखान्याबाबत बैठक पार पडल्याची माहिती आहे. आता शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांच्या कारखान्यावर अजितदादाची प्रशासक नेमण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांनी शिरूरच्या घोडगंगा सहकारी कारखान्याची बैठक लावली होती. माजी आमदार अशोक पवार यांचा मुलगा सध्या कारखान्याचा चेअरमन आहे. यावेळी बैठकीला अजित पवार गटाचे आमदार माऊली कटकेही उपस्थित होते. अजित पवार घोडगंगा बाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुण्यातील साखर संकुल येथे काही सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलही यांच्यासोबत अजित पवारांची बैठक पार पडली आहे. यामध्ये यावर चर्चा झाली. साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाचे कामकाजाचा अजित पवार यांनी आज आढावा घेतला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत घोडगंगा कारखाना विरोधकांनी लक्ष्य केला होता. याचा फटका अशोक पवार यांना बसला. आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येताच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोडगंगा कारखाना रडारवर घेतल्याचे आता बोलले जात आहे.