Ajit Pawar : पुढचा मुख्यमंत्री कुणाचा हे ठरलंय!! मुख्यमंत्रीपदाबाबत अजितदादा स्पष्टच बोलले…


Ajit Pawar : महाराष्ट्रात सध्या भाजपाप्रणित महायुतीचं सरकार अस्तित्वात आहे. जून २०२२ मध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन राज्यात बहुमताचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवारांचा गटही या सरकारमध्ये सहभागी झाला.

तसेच ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर ४१ आमदार असलेले राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत.

पुढचा मुख्यमंत्री कोणाचा असेल याविषयी सध्या अनेक चर्चा सुरु आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील घटकपक्ष शिवसेना-भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेण्याबाबत भाष्य करताना धर्मनिरपेक्षतेच्या वचनाशी कटिबद्ध असल्याचं निक्षून सांगितले युती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितले. पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. Ajit Pawar

महायुतीचे भवितव्य आणि तिची दिशा, विशेषत: नेतृत्व आणि वैचारिक भूमिकेबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वाढत चाललेल्या चर्चेवर अजित पवारांच्या वक्तव्याने प्रकाशझोत टाकला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महायुतीला नजीकच्या काळात टीकेला सामोरे जावे लागले आहे.

राष्ट्रवादीच्या पारंपरिक धर्मनिरपेक्ष भूमिकेशी विसंगत मित्रपक्षांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवरुन ही टीका झाली. आम्ही युतीवर चर्चा सुरू केली तेव्हा आम्ही स्पष्टपणे सांगितले की आमची विचारधारा ‘धर्मनिरपेक्ष’ आहे आणि आम्ही तिच्याशी अजिबात तडजोड करणार नाही. असं अजित पवार म्हणाले.

नेतृत्वाच्या प्रश्नावर, विशेषत: महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत बोलताना अजित पवार यांनी युतीचे प्राथमिक लक्ष आगामी निवडणुकीत बहुमत मिळवण्यावर असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा असेल, परंतु चेहरा ठरवणे ही सध्याची प्राथमिकता नाही, त्यामुळे महायुती एका धोरणात्मक अवस्थेत असल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीत यश मिळेपर्यंत नेतृत्वावर चर्चा थांबवल्याचे पाहायला मिळते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!