Ajit Pawar : मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही, अजित पवार आक्रमक…


Ajit Pawar : राज्यातील नेत्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या समाजघटकाविरुद्धची वक्तव्ये खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला. ते आळंदीतील मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, कुणीतरी एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल अतिशय वाईट बोलतो, त्या गोष्टीशी आम्ही अजिबात सहमत नाही. अशा गोष्टींना आमचा विरोध आहे. मतमतांतर असू शकतं.

पण कुठल्या तरी जातीला आणि धर्माविरोधात बोलता आणि समाजाविरोधात तेढ निर्माण करता. हे शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात अजितबात खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्याविरोधात जी काही कायदेशीर कारवाई केली जाणं शक्य असेल ती केली जाईल. Ajit Pawar

दरम्यान, आळंदीला दिव्याची गाडी देणार, दिलीप मोहितेंना आमदार करा असं आवाहन अजित पवार यांनी केलं. ते म्हणाले की, महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारपर्यंत गाडी पोहचली आहे. आता लाल दिव्यापर्यंत गाडी पोहचवण्यासाठी साथ द्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!