Ajit Pawar : अजित दादांनी बोलून दाखवली खंत, म्हणाले, सुप्रियांविरुद्ध सुनेत्रांना उभं करायला नको होतं, माझं मन मला…


Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजयीत सामना झाला होता. त्यात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्यभर दौरे करत आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन अजित पवार हे थेट जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी अजित पवारांना वेगवेगळे प्रश्न देखील विचारले जातात. सध्या देखील अजित पवारांना बारामतीत तुमची कोणी लाडकी बहीण आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असते. माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत आणि घरात राजकारण चालत मात्र राजकारण हे घरात शिरू द्यायचे नसते. Ajit Pawar

लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली मी बहिणी विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करायला नको होते. मात्र पार्लमेंट्री बोर्डकडून सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे तो माघारी घेता येत नाही. मात्र माझे मन मला सांगते की तसे व्हायला नको होते. असे अजित पवार म्हणाले आहेत.

…तर रक्षाबंधनालाही नक्की जाणार

दरम्यान, त्याचबरोबर रक्षाबंधनच्या दिवशी आपण सुप्रिया सुळेंकडे का जाणार का? असा प्रश्न देखील अजित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, माझा सध्या राज्यभर दौरा सुरू आहे. पण मी जर राखी पौर्णिमेला बारामतीत असलो तर माझ्या बहिणी तिथे असतील तर मी नक्कीच जाईल असं उत्तर अजित पवार यांनी दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!