Ajit Pawar : सुप्रिया सुळे कशामुळे निवडून आल्या? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सर्वांत मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…


Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात दररोज अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे कशाप्रकारे निवडून आल्या ते सांगितले आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार म्हणाले, महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे खडकवासला मतदारसंघात माहिती नव्हतं. जर ते माहिती असतं तर मतांमध्ये लाखांचा फरक पडला असता. या मतदारसंघातून २०१४ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा फटका बसला होता.

त्यावेळी सुळे यांनी खडकवासला मतदारसंघांमधून मोठी पिछाडी तर बारामतीतून आघाडी मिळाली असल्याने त्यांचा विजय झाला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. Ajit Pawar

पुढे अजित पवार म्हणाले की, जर महादेव जानकर कमळ या चिन्हावर लढले असते तर ते निवडून आले असते. यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवून महायुतीचा उमेदवार निवडून द्या. काही ठिकाणी घड्याळ काही ठिकाणी धनुष्यबाण आणि कमळ महायुतीत चिन्ह आहे, असे आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!