Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांची भावनिक साद, म्हणाले, बारामतीचा विकास करायचा असेल तर….


Ajit Pawar : बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून द्या.असे आवाहनउपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीत अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी लोकसभेचे रणशिंगच फुंकले.

पुढे बोलताना अजित पवार यांनी लोकसभेच्या उमेदवाराला सगळीकडे फिरता येत नाही.त्यामुळे बुथप्रमुख यांनी पक्षाची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. बारामतीकरांनी मला याआधी विक्रमी मतांनी निवडून दिले आहे.

त्याचप्रमाणे आमच्या लोकसभेच्या उमेदवारालाही विक्रमी मतांनी निवडून द्या. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार देण्याची घोषणाच त्यांनी अप्रत्यक्ष केली.

       

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये सातत्यानं आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शुक्रवारी बारामतीतील बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला. कुटुंबात एकटं पाडलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला तर मी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. Ajit Pawar

बारामतीमधून आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून गेला पाहिजे. आपल्याला बारामतीचा विकास करून घ्यायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची, यातून प्रश्न सुटत नाहीत.

मी मतदारसंघात न येता मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळविला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात.अशा शब्दात अजित पवार यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!