Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट करणार मोठी खेळी, राजकीय घडामोडींना वेग….


Ajit Pawar : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार? कोणत्या नेत्याच्या विरोधात कोणता नेता मैदानात असणार? याबाबत चर्चा होत आहे. तसेच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता आहे.

शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांच्यात कडवट संघर्ष होण्याची अटकळ आहे. अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्या उमेदवारीसाठी तयारी सुरू झाल्याचे दिसते. तर महाविकास आघाडी आदित्य ठाकरे यांना वरळीतील उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे.

तसेच २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून सुरेश माने यांना पराभूत केले होते. ठाकरे यांना त्या वेळेस ८९,२४८ मतं मिळाली होती, तर माने यांना २१,८२१ मतं मिळाली होती. सध्याच्या निवडणुकीत देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल असे दिसते. Ajit Pawar

दरम्यान, वरळीतील पोस्टर्समध्ये अमोल मिटकरींच्या समर्थनार्थ ‘प्रखर वकृत्व, सामान्य माणसांची पसंत’ अशा घोषणांचा उल्लेख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी यांचा सामना रंगणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती विरूदध महाविकास आघाडी असा सामना राज्यभरात रंगणार आहे. अशातच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही असाच सामना होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे मैदानात असतील तर महायुतीकडूनही तगडा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. अमोल मिटकरींना उमेदवारी दिली तर आदित्य ठाकरे विरूद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!