Ajit Pawar Group : पुण्यात अजित पवार गटाला धक्का बसणार? डॅशिंग महिला पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत….

Ajit Pawar Group : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा भोपळा फुटला पण त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेकजण शरद पवारांच्या संपर्कात असून दादांची साथ सोडून थोरल्या पवारांकडे जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची एक महिला पदाधिकारी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहे. पक्षात योग्य संधी मिळत नसल्याने नाराज होऊन पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे.
संबंधित महिला पदाधिकारी पूर्वाश्रमीची मनसेची नगरसेविका असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात पुण्यातील काही नावांची चर्चा सुरू आहे, अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर कोणत्या पक्षाची साथ देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Ajit Pawar Group

एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलून गेली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून सातत्यानं नवनवे दावे केले जात आहेत.

महायुतीतही काहीसे नाराजी नाट्य सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गट मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत मागणी करण्याच्या तयारीत आहे. तर नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबतच्या बैठकीतही १५ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे.