Ajit Pawar : महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न, काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट..


Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. यामुळे महायुतीसरकारने विविध निर्णयांचा सपाटा लावला आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आली.

सरकारमधील अनेक मंत्री अर्थखात्याच्या विरोधानंतरही कॅबिनेट बैठकीच्यापूर्वी शेवटच्या क्षणाला महत्त्वाच्या योजनांचे प्रस्ताव मांडत असल्यामुळे अजित पवार नाखूश आहेत. त्यामुळेच अजित पवार हे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या १० मिनिटांत निघून गेल्याचे सांगितले जात आहे.

यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महायुतीच्या सरकारमधील कॅबिनेट बैठकीतील वाद रोजचेच झाले आहेत. हा वाद जनतेच्या हितासाठी नाही, तर स्वत:च्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी हा वाद सुरू आहे. तिजोरित पैसा नसताना ८६-८६ निर्णय घेतले जातात. यांना कोणाची चिंता आहे.

अजित पवार यांना पूर्णपणे बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अजित पवार अनेकवेळा वित्त खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी त्या विभागात शिस्त पाळण्याचे काम केले आहे. पण, अलिकडे शिस्त बिघडवून काम सुरुय, आपल्या तिजोरीत पैसे किती आहेत आणि खर्च किती करावा याचे ताळमाळ नाही. Ajit Pawar

पैसे नसताना जीआर काढले गेले, सगळे पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे हे दिसते आहे, हे राज्याला कंगाल करुन सोडतील. जाता जाता जेवढे मिळेल तेवढे कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळेच अजितदादांनी काढता पाय घेतला असावा असेही विजय वडेट्टीवार म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!