कृषिमंत्री आता खेळा रमी!! काहीतरी जिंका आणि मला पाठवा, शेतकऱ्याची थेट कोकाटेंना मनीऑर्डर..


मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून आपल्या पडला शोभेल असे वागत नसल्याचे दिसून आले आहे. ते शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करण्यात आणि सभागृहात बसून ऑनलाइन रमी खेळण्यात व्यस्त आहेत. कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याचे अनेक आरोप लागले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून आणि सर्वसामान्य लोकांकडून देखील मागणी करण्यात येत आहे. मात्र कोकाटे यांनी याप्रकरणात हात वर करत मी रमी खेळलो नाही, मला येतच नाही असे म्हणत आरोप फेटाळून लावले होते. एवढंच नव्हे तर मी राजीनामा देण्यासारखं काय केलं आहे, कोणाचा विनयभंग केला का, असेही ते म्हणाले.

यामुळे एक वाद मिटवण्याचा नादात अजून एक वाद ते निर्माण करत आहेत. यामुळे संताप वाढत आहे. असं असतनाच आता निफाड तालुक्यातील देवगाव येथील तरुण शेतकऱ्याने अनोखं पाऊल उचलत थेट कोकाटे यांनाचा मनीऑर्डर पाठवत त्यांना साकडं घातलं आहे. 5550 रुपयांची मनीऑर्डर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठवली आहे.

‘माझ्यासाठी रमी खेळा’ काहीतरी जिंका आणि मला पाठवा!’ असं साकडं घातलं आहे. सध्या सगळीकडे त्याच तरूणाची चर्चा सुरू आहे. योगेश राजेंद्र खुळे या तरुण शेतकऱ्याने शेतात पाणी साचल्याने आणलेले सोयाबीनचे बियाणे पेरता आले नाही. त्यामुळे पडून असलेले सोयाबीनचे बियाणे त्याने विकले. आणि त्यानंतर त्या तरूणाने थेट राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनाच साकडे घातलं.

बियाणं विकल्यानंतर त्याने 5550 रुपये हे मनीऑर्डरने कृषिमंत्री कार्यालय, मुंबई येथे पाठवले आहेत. हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा, असे त्याने म्हटले आहे. शेतकऱ्यांचे हाल होत असताना कोकाटे यांचा सभागृहातील रमी खेलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. पेरणी न झाल्याने हवालदिल झालेल्या योगेश खुळेने कोकाटेंना संदेश दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!