कृषिमंत्र्यांच्या हस्ते सेवा पंधरवडा अभियानाचा शुभारंभ! गरजूंना विविध योजनांचा होणार लाभ…

वाशीम : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात या अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, उपस्थित महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. सेवा पंधरवडामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार असल्याचे नमूद केलं.
3 टप्प्यात होणाऱ्या सेवा पंधरवडामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ वाटप व सेवा द्याव्यात. शासनाच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे हेच आपले उद्दिष्ट असावं असं मनोगत व्यक्त करून शुभारंभाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी विधानपरिषद सदस्य किरणराव सरनाईक, विधानसभा सदस्य आ. सईताई डाहाके, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिल्पा सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सेवा पंधरवडामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार आहे. 3 टप्प्यात होणाऱ्या सेवा पंधरवडामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ वाटप व सेवा द्याव्यात, असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.