संतोष देशमुखानंतर मस्साजोगच मैदान कोण मारणार? पत्नी अश्विनी देशमुखांविरोधात चार अर्ज दाखल..


बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगमध्ये सरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यादेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.आता त्यांच्या विरोधात इतर चार जणांनी शड्डू ठोकला आहे.त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल का, याची शंका निर्माण झाली आहे.

सरपंचपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये अश्विनीताई देशमुख, स्वरूपानंद देशमुख, संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा स्वरूपानंद देशमुख यांचा समावेश आहे एकाच कुटुंबातील किंवा जवळच्या नात्यातील उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार की समन्वयाने मार्गी लागणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 15 एप्रिल रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर 17 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. आता या निवडणुकीच्या रिंगणातून किती उमेदवार माघार घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान. गावातील राजकीय जाणकारांच्या मते, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, 17 तारखेला किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!