जीबीएसने चिंता वाढली!! पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्येही आढळले रुग्ण, आरोग्य विभाग सतर्क…

कोल्हापूर : पुण्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे. आता गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या शंभरच्या पार गेली आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या आतापर्यंत १२० हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
हा एक दुर्मीळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही. प्राथमिक लक्षणांमध्ये हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलण्यास व गिळण्यास त्रास होणे ही असून या आजाराचे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने याचा अभ्यास शासनाच्या समितीच्यावतीने सुरू आहे. या आजारापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पुण्यामध्ये थैमान घातलेल्या जीबीएस या आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. कोगनोळी कर्नाटक येथील ६० वर्षांचे वृद्ध आणि हुपरी (ता. हातकणंगले) येथील ६ वर्षांच्या मुलावर दोन दिवसांपासून सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे.
दरम्यान, यामुळे हा व्हायरस नेमका आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळं नसांवर परिणाम होतो. स्नायू कमकुवत होवून संवेदना कमी होतात. हाता पाय किंवा चेहऱ्याच्या स्नायूंना पॅरालिसिस होण. हा दरवर्षी 1 लाख लोकांमधून 1 व्यक्तीला हा आजार होतो.
यावर उपाय म्हणजे, हात पाय वारंवार धुवा, योग्य आहार घ्या, संक्रमित रुग्णांपासून दूर राहा
शरिरात मुंग्या येत असेल किंवा कमकुवतपणा जाणवत असेल तर डॉक्टरांशी तातडने संपर्क साधा. 16 गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.