नाशिकनंतर अमरावती हादरलं! 180 तरुणींच लैंगिक शोषण अन् 50 व्हिडिओ व्हायरल, भाजप खासदाराची थेट अधीक्षकाकडे तक्रार..

अमरावती : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणांन राज्यातील वातावरण ढवळून निघाल असताना आता अमरावतीतील हिंदू -मुस्लिम तरुणींचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एका तरुणाने 180 तरुणीचें लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यानी याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात एका तरुणाने 180 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची लैंगिक शोषण केले आहे आणि सुमारे 350 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. याप्रकरणी खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.शिवाय त्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेच्या तपासाविषयी संपर्क साधला आहे.
अयाज मोहम्मद तनवीर अस त्या तरुणाचं नाव आहे. या तरुणावर 180 तरुणीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित एका पिडीत तरुणीने खासदार बोंडे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.त्यानंतर हा प्रकार समोर आणला त्यांनी याला लव्ह जिहाद संबंधित असल्याच म्हटल आहे.

खासदार बोंडे यांनी आरोप केला की, काही युवकांकडून तरुणींना धमकावून व ब्लॅकमेल करून त्यांचे आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात आले असून, ते सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहे. या माध्यमातून पैशांची उकळपट्टी व दबाव टाकण्याचे प्रकार घडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.मागील काही दिवसांपासून हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान अमरावतीत निर्माण झालेल्या या राड्यामुळे काही संघटनांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची प्राथमिक पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर येत असून, अधिकृत तपासानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.