मोफत शिक्षणानंतर शिक्षण विभागाचा आता अजून एक क्रांतिकारी निर्णय!! शिक्षणासाठी बाहेर राहण्याचे टेन्शन मिटणार….

पुणे : शिक्षणासाठी अनेकदा घर सोडून बाहेर राहावे लागले. यामुळे अनेकदा पैशांची अडचण निर्माण होते. आता या बाहेर राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी बांधलेल्या वसतिगृहांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

याचा अनेक विद्यार्थिनींना फायदा होणार आहे. अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींना वसतिगृहाचा लाभ घेता येण्यासाठी उच्च शिक्षणाव्यतिरिक्त अन्य विद्यार्थिनींनाही वसतिगृहांत प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.
यामध्ये वसतिगृहातील रिक्त जागांवर अल्पसंख्याक समाजातील दहावी ते बारावी, आयटीआय, पदविका, तंत्रनिकेतनमघील विद्यार्थिनींनाही प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे गरजू विद्यार्थिनींची सोय होऊ शकणार आहे. यामुळे बाहेर राहण्यासाठी लागणारे पैसे वाचणार आहेत. यामुळे शिक्षणात कोणती अडचण येणार नाही.

अल्पसंख्याक विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या वसतिगृहांतील प्रवेशासाठीचे निकष 2013 आणि 2021 मध्ये निश्चित करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. याचा देखील फायदा होणार आहे.
यासाठी आता अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहात बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर वसतिगृहातील जागा रिक्त राहिल्यास त्या जागांवर दहावी ते बारावी, पदविका, पदविका, आयटीआय, तंत्रनिकेतन संस्थांतील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
दरम्यान, यामध्ये अत्यंत अल्प शुल्कात राहण्याची सोय होणार असल्याने शिक्षण सुलभ होणार आहे. तर या सुविधेचा अधिकाधिक विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे याचा येणाऱ्या काळात नक्कीच फायदा होईल.