बिहार, उत्तर प्रदेश नंतर रेल्वे मार्गावर घातपाताचा प्रकार उरुळीकांचनमध्ये घडला! स्थलांतरीत नागरीकांच्या वास्तव्याचा मुद्दा चिंतेचा; थेऊर, उरुळीकांचन नंतर आणखी काही…


(जयदिप जाधव )

उरुळीकांचन : उरुळीकांचन रेल्वे स्थानकाजवळ भरगच्च गॅस सिलेंडर रेल्वे रुळावर आढळल्यानंतर या प्रकारावरून बिहार, उत्तर प्रदेश प्रमाणे रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेऊन घातपात घडवून आणण्याचा यापूर्वी झालेला प्रयत्न उरुळीकांचन रेल्वे स्थानकावर उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून रेल्वे सुरक्षिततेबरोबर कट रचलल्याचा प्रकरणी स्थानिक स्थलांतरीत नागरीकांचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून या परप्रांतीय नागरीकांची झाडाझडती बरोबर स्थानिक रहिवासी नागरीकांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसह स्थानिक नागरीकांवर येऊन ठेपले आहे.

थेऊर येथे बेकायदा वास्तव असलेल्या बांगलादेशीला दहशतवादी विरोधी पथक (एटीएस ) ने ताब्यात घेतल्यानंतर बेकायदा स्थालांतरीत नागरीकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच उरुळीकांचन सारख्या रेल्वे स्थानकावर परराज्यातील वापराचे प्रिया गोल्ड कंपनी नामक गॅस सिलेंडर आढळल्यानंतर या घटनेमागे घातपाताचा कट असल्याचा तपास यंत्रणांनी सुरू केला आहे. या प्रकाराने सर्व प्रथम स्थलांतरीत नागरीकांचा प्रश्न आता प्राकर्षाने जाणवत असून नागरीकांची ओळखपहेचान फार महत्त्वाची ठरणार आहे.

पुणे शहराच्या उपनगरालगत झपाट्याने शहरीकरण वाढू लागले असून परप्रांतीय नागरीकांचा लोंढा रोजगारीच्या शोधात धडकत आहे. मिळेल त्या ठिकाणे भाड्याने राहून या ठिकाणी स्थलांतरीत नागरीकांना परप्रांतीय नागरीक आश्रय देत आहे. अनेक भाडेकरू ओळख नसतानाही या परप्रांतीय नागरीक यांना घरभाड्याचा मोहापायी भाडेकरू बनवत आहे.तर बनावट कागदपत्रे तयार करुन हे परप्रांतीय आश्रय घेत आहेत. मात्र या सर्व घडामोडींत बेकायदा वास्तव करणाऱ्या नागरीकांची ओळख पटविणे अतिशय जिकीरीचे झाले असून अशा मुक्त संचारणाऱ्या नागरीकांनी धोका उद्भवू शकतो अशी शक्यता नाकारता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

शहरालगत अनेक मोठ्या ग्रामपंचायतीत परप्रांतीय नागरीकांची बेकायदा वास्तव वाढत चालले असून त्यांना आश्रय देणे हा पण गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. मात्र या सर्व प्रकारांकडे स्थानिकांच्या बरोबरीने पोलिस दलाची जबाबदारी असून अशा बेकायदा वास्तव राहणाऱ्या नागरीकांची ओळख लपवित जाणे असे कृत्य उघडमाथ्याने होत असून अशा घारमारकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

उरुळीकांचनला एटीएस पथक तळ ठोकून…

उरुळीकांचन रेल्वे स्थानकावर रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर २१९/७-५पुणे बाजूकडे हा भरगच्च सिलेंडर आढळून आल्यानंतर पुणे -सिकंदराबाद निज्जामुद्दीन रेल्वे गाडीच्या पायलटने रेल्वेगाडी थांवबून प्रसंगावधान ठेवून हा प्रकार टाळला आहे. मात्र बिहार व उत्तर प्रदेशात असे प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे या घटनेचा शोध घेण्यासाठी दहशतवादी विरोधी पथक हे उरुळीकांचन शहरात तळठोकून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!