रेव्ह पार्टी प्रकरणी जावयावर कारवाई ; एकनाथ खडसेंचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले…..


पुणे : पुण्यातील खराडी येथे पोलिसांनी टाकलेल्या रेव्ह पार्टीच्या छाप्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यावरून आता जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. यावर आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत जावयावर पाळत ठेवल्याचा आरोप केला आहे

प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांच्यावर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, सात जणांनी मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही, डान्स नाही. एका घरामध्ये सात जण बसलेले आहेत, त्यांनी त्यांची पार्टी चालली आहे. जर याला रेव्ह पार्टी म्हणत असाल तर महाराष्ट्रात देशामध्ये घरामध्ये सात जण बसले तर त्याला रेव्ह पार्टी म्हणावी लागेल. असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अमली पदार्थ एका मुलीच्या पर्समध्ये सापडला आहे आणि तो कसा आला हे तिला पण माहिती नाही. तिला आरोपी नंबर एक बनवले पाहिजे होते. प्रांजल खेवलंकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय? त्यांच्यावर एकही गुन्हा नसताना त्यांच्यावर गुन्हा असल्याचा सांगण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पोलिसांनी ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली, त्याचे चित्रण हे जगासमोर आले आहे. पोलिसांना कोणती अधिकार आहे पर्सनल लाईफ दाखवण्याचा, पोलिसांनी हे बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे. खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी करणं आणि खडसेंच्या जावयाच नाव घेण म्हणजे हे सर्व एकनाथ खडसे यांच्या फॅमिलीला बदनाम करण्याच कृत्य असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

माझ्या जावयाच्या मोबाईलमधील खासगी फोटो व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांनी कोणी दिला, असाही मोठा प्रश्न यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. काहीही झाले तरीही या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असंही त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!