विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक, २४ तासात न्यायालयात दोषारोपत्रही दाखल, लोणी काळभोर पोलिसांची कारवाई…

लोणी काळभोर : विवाहानंतरही आपले जुने प्रेमसंबंध चालू राहू दे, असे म्हणून महिलेची छेडछाड, प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची उघटना उघडकीस आली आहे.
लोणी काळभोर (ता.हवेली) परिसरात ही घटना सोमवारी (ता.१७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्याआत अटक करून गुन्ह्याचे दोषारोपत्र २४ तासाच्या आत न्यायालयात दाखल केले आहे.
अजय दिलीप भोसले (वय.३२, रा. ड्रिम्स निवारा सोसायटी, कोरेगांव मुळ ता. हवेली जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्या लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतात. फिर्यादी व आरोपी अजय भोसले यांची फिर्यादी यांच्या विवाहाच्या आगोदरपासून ओळख होती. फिर्यादी व आरोपी यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले होते. काही वर्षापूर्वी फिर्यादी यांचा विवाह झाल्याने त्यांनी आरोपी अजय भोसले याच्यासोबतचे सर्व नाते तोडले होते.
दरम्यान, आरोपी अजय भोसले फिर्यादी यांच्या घरासमोर एकेदिवशी आला. आरोपीने फिर्यादी यांचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणाला तु मला सोडुन जावु नकोस, मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही, आपले प्रेमसंबंध चालु राहू दे असे म्हणून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
फिर्यादी यांनी आरोपी भोसले यास तु जे करीत आहेस ते चुकीचे आहे. असे समजावुन सांगत होत्या. फिर्यादीचे आरोपीने काहीही ऐकुन न घेतल्याने फिर्यादी यांनी आरोपीचा हात झटकुन त्याला धक्का दिला. धक्का दिल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.
याआगोदारही आरोपी अजय भोसले याने फिर्यादी यांचे प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसेच फिर्यादी या कामानिमित्त घराबाहेर जात असताना, आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला. अशी तक्रार महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार आरोपी अजय भोसले याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74,78,115 (2),352,351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एवढ्या त्वरित कारवाई केल्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.