अपघातग्रस्त रुग्णांना आता 1 लाखांपर्यंत मोफत उपचार, राज्य सरकारचा मोठा निर्णय….

मुंबई : राज्य सरकारने अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता या रुग्णांसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.
रूग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारींसाठी स्वतंत्र मोबाईलवर देखील तयार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती देखील देण्यात आली आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर घेतला.
तसेच दर महिन्याला प्रत्येक रूग्णालयाने आरोग्य शिबीर घेऊन किमान पाच रूग्णांवर कॅशलेश उपचार करणं बंधनकारक असणार आहे. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश आबिटकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामुळे या व्यवस्थेत काही बदल दिसून येतील.
शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धी करावी, असेही या बैठकीत सांगितले गेले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील.