Accident News : पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीत ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, हडपसर येथील दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू…


Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. एचपी डेपोच्या समोर अज्ञात ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातातदुचाकीवरील दोन २६ वर्षीय तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. Accident News

गणेश विठ्ठल हवालदार (वय-२६), आदित्य हरिदास साठे (वय २६, रा. दोघेही, महादेवनगर, हडपसर, ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. Accident News 

हा भीषण अपघात शनिवारी (ता. २१) रात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि ट्रकचे दोन्ही चाके त्या तरुणांच्या अंगावरून नेल्याची माहिती आहे. लोणी काळभोर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहिती नुसार, गणेश व आदित्य हे थेऊर (ता. हवेली) येथून घरी महादेवनगर येथे पुणे – सोलापूर महामार्गावरून निघाले होते. लोणी काळभोर हद्दीतील एच. पी डेपोसमोर आले असता दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी हि रस्ता दुभाजकाला धडकली. दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दोघेही सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या दिशेला उडून पडले.

यावेळी सोलापूरच्या दिशेने निघालेल्या अज्ञात भरधाव ट्रकने दोघांच्या अंगावरून गेली. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले.

दरम्यान, सदर घटनेचा पंचनामा झाला असून गुन्हा अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!