Accident News : दुःखद! ऊसतोड मजुरांच्या गाडीला भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू, १० जखमी…

Accident News : ऊसतोड कामगार गावाकडे जात असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबलेल्या कामगारांवर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल १० जण जखमी झाले आहेत.

मृतांतील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे. ही घटना नागपूर-रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोनच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शालन दत्तात्रय खांडेकर (वय ३० रा. शिरनांदगी) जगमा तम्मा हेगडे (वय ३५ ) दादा आप्पा ऐवळे (वय १७) निलाबाई परशुराम ऐवळे (वय ३ रा. चिक्कलगी) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते, येथील काही ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. Accident News

दरम्यान, यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे परतत होते. त्यावेळी मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकनं मागू येऊन धडक दिली.