लालबाग राजाच्या परिसरात दुर्घटना; दोन चिमुकल्यांना चिरडून वाहन चालक फरार, पोलिसांकडून तपास सुरू…


मुंबई : दहा दिवस लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज त्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी निरोप दिला जात आहे. त्यामुळे लाखो गणेशभक्त मुंबईत आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, बाप्पाला निरोप देत असतानाच आता एक धक्कादायक घटना घडली आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील मार्गावर भरधाव येणाऱ्या गाडीने दोन चिमुकल्यांना चिरडले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात 2 वर्षांची चंद्रा वजणदार हिचा जागीच मृत्यू तर 11 वर्षीय शैलू वजणदार हा अपघातात गंभीर जखमी झाला. अपघातानंतर लगेचच दोघांनीही जवळ असलेल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. लालबाग राजाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असल्याने मोठी गर्दी रस्त्यावर होती आणि अपघाताबद्दल माहिती कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

परळच्या केईएम रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले. मात्र, दोन वर्षाच्या चंद्राला वाचवण्यात यश मिळाले नाही. 11 वर्षीय शैलू याच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब अशी की, अपघातानंतर गाडी घेऊन तो व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा हा दाखल करण्यात आलाय. सध्या चालकाचा आणि त्याच्या गाडीचा शोध हा पोलिसांकडून घेतला जात आहे.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!